गडचिरोली जिल्ह्यात, विशेषतः सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता आहे. तेलंगणामधील श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पातून जवळपास ८ लाख क्युसेक पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढेल आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.प्रशासनाने नागरिकांना आणि मच्छिमारांना नदीच्या पात्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, जनावरांनाही नदीकाठी नेऊ नये असे आवाहन केले आहे.