सेनगांव तालुक्यातील वरुड चक्रपान ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसभेचे आयोजन करून विविध विषयावर चर्चा करण्यात आली आहे. सदरची ग्रामसभा सरपंच माणिकराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर ग्रामसभेमध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 ची जनजागृती करणे,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणे यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.