अखेर मुंबई भाऊचा धक्का ते विजयदुर्ग अशी एम टू एम रो रो बोट सिंधुदुर्ग मध्ये दाखल झाली. विजयदुर्ग बंदरामध्ये या बोटसेवेची चाचणी यशस्वीपणे पार पडली. मंगळवारी संध्याकाळी ही बोट विजयदुर्ग जेटीवर पोचली. यावेळी विजयदुर्ग ग्रा.पं.व भाजप पडेल मंडल तर्फे बोटीचे स्वागत करण्यात आले. लवकरच ही रो रो सेवा नियमित करण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी आज बुधवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दिली.