रत्नागिरी शहरातील मांडवी येथील सदानंदवाडी येथे किरकोळ वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. शनिवारी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यास ७ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत दोघेजण जखमी आहेत.