गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ.महेश लांडगे यांच्या निवासस्थानी आगमन करून लांडगे परिवारात विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे, विधान परिषदेच्या आमदार मा. उमाताई खापरे, आमदार मा. अमित गोरखे, ज्येष्ठ नेते मा. सदाशिव खाडे, सरचिटणीस श्री. विकास डोळस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.