कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वपूर्ण गाव असलेले आणि सातारा लोणंद पुणे महामार्गावरील पिंपोडे खुर्द येथे अनेकदा मागणी करून देखील एस. टी. बसेस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एस.टी. बस रोखून धरत संताप व्यक्त केला. साताऱ्याकडे धावणाऱ्या सर्व एस. टी. बसेस या पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन आणि देऊर या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या तक्रारी होत असूनही दुर्लक्ष केले जात आहे.