शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन जणांना दोन वर्षे कारावासासह दंडाची शिक्षा कराड सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. याबाबत कराड शहर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कराड शहरातील भेदा चौक परिसरात विजय दिनकर संदे वय 42, सचिन दिनकर संदे वय 30, अभय दिनकर संदे वय 34 सर्व राहणार वडगांव हवेली, तालुका कराड हे एकमेकांना काठ्यांनी मारहाण करत होते.