सौरभ होरे फाउंडेशन च्या वतीने १० ऑगस्ट ते १० सप्टेंबरला वृक्षारोपण अभियाना अंतर्गत आज दि ७ सप्टेंबरला १२ वाजता गुलमोहर कॉलनी, कर्मयोगी गाडगे बाबा चौक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, ओंकार नगर व परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षारोपण कार्यक्रम करिता प्रमुख पाहुणे म्हणून मा. बळीराज धोटे, मुख्य संघटक, सेल्फ रिस्फेक्ट मुव्हमेंट, भास्कर मून, संघटक, सेल्फ रिस्फेक्ट मुव्हमेंट, चंद्रपूर, जयभारात नवाडे, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृती समिती आदीसह मान्यवर उपस्थित होते.