22 जूनला रात्री 10:40 च्या सुमारास पोलीस ठाणे कोतवाली हद्दीतील उधोजी गल्ली येथे राहणारा ऋत्विक दारोडकर वय 16 वर्ष हा घराच्या पाण्याच्या टाकीतून पाणी काढत असताना पाण्याच्या टाकीमध्ये लागलेली इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटरचा इलेक्ट्रिक करंट लागल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला उपचाराकरता खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रवीण दारोडकर यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलीस स्टेशन कोतवाली येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.