मेळघाटातील गणपती विसर्जनाला गेलेला ३६ वर्षीय युवक हा गणपती विसर्जनादरम्यान गडगा नदी पात्रात वाहून गेल्याची घटना काल रविवार रोजी सायं ६ वाजता घडली.गणेश माकोडे असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे काल विसर्जन करिता मृतक युवक हा गणपती विसर्जन करण्यासाठी गडगा नदीवर गेला होता.विसर्जन दरम्यान त्याचा पाय घसरला आणि नदीच्या प्रवाहात वाहून गेला.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या जवानांना पाचारण केले.