आज दिनांक 6 सप्टेंबरला पोलीस सूत्रांकडून कडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहिती नुसार, मोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन वारंवार शारीरिक संबंध करुन लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार एका महिलेने दिनांक पाच सप्टेंबर रोजी सहा वाजून नऊ मिनिटांनी मोर्शी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी विष्णू शंकर भारस्कर नावाच्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे