अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह देशभरातून लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील गावांमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. कोकणचा गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून तो कोकण वासियांसाठी एक जिव्हाळ्याचा सोहळा आहे. या सोहळ्याची ओढ आणि बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता प्रत्येकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून या वर्षी सुमारे सहा ते सात लाख भाविक कोकणात येतील असा अंदाज आहे.