लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली पत्रकातील पत्रकार दिवसेंदिवस काम करून जनतेला न्याय देण्यासाठी व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत.मात्र पत्रकारावर सातत्याने हल्ले होत असल्याने त्यांच्या जीवीत्वांचा खेळ करून त्यांचे संसार उध्वस्त केले जात आहेत.अशातच अकोला येथील दैनिक सुफ्फाचे संपादक यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्राणघातक हल्ला केला त्यांच्या निषेधार्थ बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांना शुक्रवार रोजी निवेदन देण्यात आले.