गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने कोयता घेऊन दुचाकीवरून फिरणाऱ्या दोघांना कुपवाड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दुचाकी, धारदार कोयता जप्त केला. निखिल अनिल साठे (वय १८, रा. शांत कॉलनी, कुपवाड), प्रणित प्रकाश मागाडे (वय २१, रा. कापसे प्लॉट, गणपती मंदिरशेजारी, कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. कुपवाड पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी २२ ऑगस्ट रोजी रात्री कुपवाड शहरातील सोसायटी चौक परिसरात गस्तीवर होते. रात्री सव्वा बारा वाजता दोन तरुण संशयितरित्या दुचाकी (क्र. एमएच १०