भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यात हजारो रोहिंग्या व बांगलादेशी राहत असल्याचा आरोप केला होता. यासाठी त्यांनी वारंवार अमरावतीत दौरे करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत होता. मात्र काँग्रेसचे खासदार खा. बळवंत वानखडे यांनी माहितीच्या अधिकारातून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एकही रोहिंग्या किंवा बांगलादेशी नागरिक नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.