📰 बातमी कोथरूडमधील आनंदनगर परिसरात गणेशोत्सवाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या श्री साई मित्र मंडळातर्फे यंदा भव्य असा कैलास मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. हिमालयातील कैलास पर्वत, भगवान शंकराचे निवासस्थान आणि नंदीची प्रतिकृती या देखाव्यात साकारण्यात आली असून, बर्फाच्छादित डोंगररांगा, कलात्मक मंदिररचना आणि आकर्षक प्रकाशयोजना यामुळे हा देखावा मंडपाला दिव्य स्वरूप प्राप्त करून देतो आहे. दरवर्षी नाविन्यपूर्ण सजावटीसाठी ओळखले जाणारे हे मंडळ यंदाही गणेशभक्तांसाठी