पंचवटी व म्हसरूळ हद्दीत घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीला अमृतधाम भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव पाचोरा येथील रहिवासी फारूक रज्जाक काकर हा जळगाव वरून रेल्वे नाशिक येथे येऊन घरफोडी करत होता व घरफोडी करून पुन्हा रेल्वेने जळगाव येथे पळून जात होता. पंचवटी म्हसरूळ भागात त्याने घरफोडी केल्याचे कमी केले आहे.त्याच्या ताब्यातून 11 तोळे सोने 1 किलो व 52 ग्रॅम चांदी असे एकूण 13 लाख 6 हजार 754 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.