सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वीस वर्षांपूर्वी चोरी झाली होती त्यामध्ये दागिने चोरीस गेले होते. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सापडल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. सातारा शहर पोलिसांनी फिर्यादी व्यक्तीचा शोध घेऊन त्यास मुंबई येथून बोलावून घेत मुद्देमाल परत केला. सातारा शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता फिर्यादी व्यक्तीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या हस्ते देण्यात आला.