दिग्रस तालुक्यातील तूपटाकळी गावाजवळ दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता दोन अज्ञात युवकांनी प्रवीण रामचंद्र वांझड यांची दुचाकी (क्र. एमएच-२९ सीडी १२११) थांबवून चाकूचा धाक दाखवत ११ हजार रुपये रोख, मोबाईल व दुचाकी असा एकूण ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला होता. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अखेर तपास चक्रे फिरवत पोलिसांनी आरोपी समीर शाह समी शाह (वय-१८, रा. मोबिनपुरा, आर्णी) याला २४ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजता आर्णी येथून अटक केली.