कळमना गावात ग्रामस्थांच्या आरोग्य सुरक्षा व जागरूकतेसाठी टाटा ट्रस्ट चंद्रपूर व उपकेंद्र पाढरपौणी यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आज दि 9 सप्टेंबर ला 12 वाजता आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते झाले. शिबिरात तब्बल १२८ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये बीपी, शुगर तपासणी, ओरल कॅन्सर स्क्रिनिंग, गर्भाशय कॅन्सर स्क्रिनींग तपासणी करण्यात आली.