गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा उत्सव. पण या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होते. 'दगडूशेठ' गणपतीच्या चरणी भक्तीभावाने अर्पण केलेले फुले, हार, नारळ हे निर्माल्य शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरत आहे. मागीस नऊ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ पुणे युवा या निर्माल्याला नवा अर्थ देत आहे.