मोहाडी तालुक्यातील मौजा सुकळी येथे दिनांक २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता दरम्यान अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर (क्र. MH40-CD-9646) चालकाने पोलिसांचा आदेश धुडकावून रेती रस्त्यावर खाली करून पळ काढला. फिर्यादी गणेश रघुनाथ ठवकर (वय ४९, रा. कान्हळगाव) व पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना हा प्रकार घडला. पळून जाणाऱ्या टिप्परला ब्रेझा कार क्र. MH36 AG-2933 चा चालक पिंटू ठवकर (रा. सुकळी) याने मध्ये येऊन अडथळा निर्माण करत टिप्परला पडून जाण्यास सहकार्य केले आणि शासकीय कामात अडथळा आणला.