प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या पुनर्पडताळणी अहवाल पाठविण्यासाठी जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितली, आरोपी सहायक महसूल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रशासकीय भवन कार्यालयात बोलाविले होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत प्रशासकीय भवन येथील उपजिल्हाधिकारी पुनर्वसन कार्यालय चंद्रपूर मध्ये ३० हजार रुपये स्वीकारताना आज दि २८ सप्टेंबर ला १२ वाजताच्या सुमारास नरेंद्र खांडेकर यांना अटक केली.