यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात माजी खासदार उन्मेश पाटील हे आले होते. व त्यांनी शेतकरी बांधवांना व केळी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच जळगाव येथे होणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी होण्याची आवाहन केले आहे. दिनांक १७ सप्टेंबर रोजी जळगाव येथे आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढला जाणार आहे. या तालुक्यातून मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.