भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे हे दिनांक 1 सप्टेंबर रोजी भंडारा शहरातील श्री गणेश दर्शन दौऱ्यावर असताना त्यांनी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान भंडारा शहरातील गांधी चौकात भंडाराचा राजा गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी माजी खासदार मेंढे यांनी श्री गणेशजींच्या आरतीला उपस्थित राहून गणपती बाप्पांच्या चरणी जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली. यावेळी माजी खासदार सुनील मेंढे यांच्यासह विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय संपर्कप्रमुख शुभांगी सुनील मेंढे व अन्य हजार होते.