भूम तालुक्यातील पार्डी घाटात गुरुवारी (दि. ११) रात्री ११.३० ते १२:०० वाजण्याच्या सुमारास एक मालवाहतूक करणारी ट्रक मधून लुटण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून करण्यात आला. मात्र ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठी लूट टळली असून चोरट्यांकडून अंदाजे पंधरा ते वीस पोते ज्वारीचे लंपास करण्यात आले आहे.