मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्या साठी साकोली तहसील कार्यालयावर मंगळवार दि.9 सप्टेंबरला दुपारी चार वाजता ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी समाजाच्या नागरिकांनी भव्य मोर्चाचे आयोजन केले.ओबीसी आरक्षणाला संरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.ओबीसी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते