सततच्या पावसामुळे वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आंजी (मोठी) परिसरातील बालाई, मजरा, कासारखेडा, पवनूर आणि आंजी या शिवारातील शेतांमध्ये युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी ता. 10 बुधवारी दुपारी 3 वाजता पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी कृषी अधिकारी तसेच मंडळ अधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची स्थिती प्रत्यक्ष मांडली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे सादर करावे, अशी मागणी त्यांनी केली.