गुजरी चौक येथे १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कचरा गाडी चालकावर दोन आरोपींनी हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धार्थ मनोहर निबाळकर (वय २२, धंदा – मजुरी, रा. सुलतानपुरा, अचलपूर) हा कचरा गाडीतून कचरा घेऊन जात असताना आरोपी अनिकेत खोलापुरे (वय २४) व रोषण चौधरी (वय २३, दोघेही रा. सुलतानपुरा, अचलपूर) यांनी त्याला अडवले. फिर्यादीने कारण विचारले असता आरोपींनी त्याच्या अंगावर धाव घेत मारहाण केली, थपडा मारल्या व लोटलाट केली. यावेळी आरोपींनी