बुलढाणा शहरासह जिल्ह्यात २७ ऑगस्ट रोजी बाप्पांचे आगमण झाले आहे. गणेशोत्सवादरम्यान कुठलीही अनुचीत घटना घडू नये यासाठी २७ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये २०० पोलीस अधिकाऱ्यांसह २५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तसेच १३०० होमगार्ड, दंगा काबू पथके सात, शिघ्र कृती दल एक आणि एसआरपीएफच्या चार प्लाटून तैनात करण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली आहे.