अंबरनाथ तहसीलदार अमित पुरी यांच्या मजुरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही आदिवासी बांधव अमित पुरी यांच्याकडे जमीन प्रकरणच्या तारखेच्या सुनावणीसाठी गेल्यावर जाब विचारला असता संतापलेल्या पुरी यांनी आदिवासी बांधवांशी उद्धट बोलून त्यांना दमदाटी केल्याच्या व्हिडिओ समोर आला आहे. आदिवासी बांधवांना तहसीलदार वाईट वागणूक देतात असा आरोप करत महेश कोते नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.