लातूर -लातूर शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून बांधकाम परवाना मिळवण्यासाठी प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागत आहे. विशेषतः लो रिस्क आणि मॉडरेट रिस्क बांधकाम परवानग्यांमध्ये होणारा विलंब गंभीर ठरत असून याबाबत लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी महापालिकेला आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता निवेदन दिले.