जिंतूर साठे नगर परिसरात कुरेशी समाजाच्या दोन गटांमध्ये सुरू झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर लाठीकाठी, लोखंडी रॉडच्या तुंबळ हाणामारीत झाले. यामध्ये आठ जण गंभीर जखमी झाले असून ; दोघांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींना परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना रविवार 24 ऑगस्टच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी उसळली. वाढता तणाव लक्षात घेऊन जिंतूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त उभा केला.