तालुक्यातील कोसरसार मकसुर शिवारात वीज पडून आज दि 17 जुलै 2 वाजता च्या सुमारास शेतमजुराचा मृत्यू झाला. शेतात पराठी खुरपण्याचे काम चालू असताना अचानक विजेचा गडगडाट चालू झाला. लपण्यासाठी शेतमजूर रावबा दादाजी मंगाम वय 45 हे विजेपासून बचावासाठी शेतात असलेल्या पळसाच्या झाडाखाली लपण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.