एका २५ वर्षीय युवकाचा जनुना तलाव येथे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.खामगाव शहरातील सती फैल येथील स्वप्निल विजय गायकवाड वय २५ वर्ष हा युवक जनुना तलाव येथे पाण्यात मृत अवस्थेत नागरिकांना दिसून आला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी त्याला सामान्य रुग्णालयात नेले. मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महादेव माणिक फंड यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.