सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत डुक्कर आडवे गेल्याने पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना पुणे सोलापूर महामार्गावरील अल्फा पेट्रोल पंपा समोर घडली. यावेळी सदर अधिकाऱ्याची चार चाकी ही ट्रकला धडकल्याने त्यामध्ये ते गंभीरित्या जखमी झाले त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.