पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या अनुदानात १ कोटी २२ लाखांचा अपहार झाल्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात उघडकीस आले होते. याबाबत पाचोरा शहरासह जिल्ह्यातील ३३७ तरुणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, यामुळे बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी आणि बेरोजगारांना पाचोरा येथील तहसील कार्यालयात येऊन लेखी स्वरूपात पुराव्यासहित खुलासे सादर करावे लागणार असल्याची माहिती आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे,