स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात यश मिळविले आहे. पथक पेट्रोलिंग करत असताना अनिकेत गजानन कामारकर वय २१, रा. महागाव हा युवक विनानंबर हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलवर फिरताना दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान आढळून आला. पथकाने आरोपीस ताब्यात घेऊन महागाव पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आज दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान महागाव पोलिसांनी दिली आहे.