नंदुरबार तालुक्यातील समशेरपुर गावातील शेतकरी नयन रवींद्र पाटील यांच्या राहत्या घरात ७ ऑगस्ट रोजी रात्री अकरा ते ८ ऑगस्ट रोजी सकाळी पाचच्या दरम्यान काळात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ८५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी तालुका पोलिसात दाखल फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.