अकोल्याच्या रामदासपेठ पोलीस हद्दीतील उत्तमचंद प्लॉट भागात गोवंश मांस विक्री होत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिस व कार्यकर्त्यांनी संयुक्त कारवाई करत धाड टाकली. या कारवाईत १०० ते १५० किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले आणि एक व्यक्तीला अटक करण्यात आली. जप्त मांस आणि आरोपी पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी खळबळ उडाली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय