लातूर :-ब्रम्हाकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी (२५ ऑगस्ट २०२५) व विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने संस्थेतर्फे भारतासह नेपाळात विशाल रक्तदान महाअभियान राबवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात येणार आहे. या महाअभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ१७ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी.नड्डा यांच्या हस्ते झाला. राष्ट्रीय शुभारंभानंतर भारत व नेपाळमध्ये रक्तदान शिबीरांना सुरूवात होत आहे.