ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष सुरुवातीपासून सुरू आहे बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे ओबीसी समाज बांधवांकडून बॅनर लावण्यात आले होते त्या बॅनर वरती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अहिल्यादेवी होळकर लक्ष्मण हाके यांचा फोटो होता मात्र ते बॅनर मध्यरात्री फाडण्यात आले आणि यानंतर ओबीसी समाज बांधव आणि मराठा समाज बांधव आमने सामन्या आल्याचा पाहायला मिळाले यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंच्या लोकांना शांततेचे आवाहन केले यानंतर बॅनर फाडणाऱ्या चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.