पाली अंबा नदी पुलाजवळ अंबा नदी पात्रात गुरुवारी (ता.11) सकाळी एका अनोळख्या व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या संदर्भात पाली पोलिसांचा तपास सुरु आहे. पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच पोलीस अधिकारी व पोलीस या ठिकाणी पोहचले व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या अज्ञात व्यक्तीचे वय साधारण 50 ते 55 च्या दरम्यान असून अंगावर निळ्या कलरचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची हाफ पॅन्ट घातलेली आहे.