दुचाकी चालक हा टिळेकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडे निघाला होता. तर टेम्पोचालक हा रेल्वे उड्डाणपुलाजवळून वळण घेत होता.दरम्यान, दुचाकी चालक हा बाजूला थांबला असता टेम्पोचालकाचे वळण घेताना गाडीवरील नियंत्रण सुटले व दुचाकीला जोरात धडक दिली. यावेळी दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झाल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. अपघातग्रस्त व टेम्पो चालक या दोघांचीही अद्याप नावे मिळू शकली नसून अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.