स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक आणि आधुनिक स्मार्टग्राम म्हणून लौकिक असलेल्या कळमना गावात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्याच परंपरेला पुढे नेत आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी पाणीटंचाईसारख्या ज्वलंत प्रश्नावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषद शाळा, कळमना येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम आज दि 12 सप्टेंबर ला 11 वाजता राबविला आहे.