लातूर -२७ ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढ्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे तब्बल ३९ ठिकाणी रस्ते व पुलावरून पाणी वाहत असून वाहतूक बंद करण्यात आली आहे.जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पूल वा रस्त्यावर पाणी असताना प्रवास टाळावा, तसेच पूरप्रवण भागात जाणे धोकादायक ठरू शकते" असे आवाहन केले आहे.