माजी मंत्री यशोमती ठाकुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न उपस्थित करत आगामी एशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा तीव्र विरोध नोंदविला आहे.यापूर्वी काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतमातेचे सुपुत्र हुतात्मा झाले. त्यांच्या बलिदानानंतरही भारत-पाकिस्तान सामन्याला परवानगी देणे हे त्या शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.