शहरालगत चिखलगाव येथे एका युवकाला गावातील गुंड प्रवृत्तीच्या इसमाने धमकावत त्याच्या खिशातून बळजबरीने तीन हजार रुपये हिसकावल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून आरोपी अमोल ठाकरे विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.