वांगणीयेथील अल्पवयीन मुलगा गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेला होता. तिथे तीन जणांनी अपहरण करून त्याच्या आईकडे 12 लाखाची खंडणी मागितली. बदलापूर ग्रामीण पोलिसांचे पथक गुजरातच्या दिशेने रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. मात्र अल्पवयीन मुलाला रेल्वे स्टेशन मध्ये आरोपीने सोडले होते त्यानंतर त्याने मोबाईल बंद केला होता, त्यामुळे त्याला शोधण्यात अनेक अडथळे येत होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तरुणाला ताब्यात घेऊन सुखरूप आईकडे सुपूर्द केल्याची माहिती दिली.