भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी दि. २८ ऑगस्ट रोजी टाकलेल्या धाडीत विविध ठिकाणचे दारू व जुगाराचे १२ अड्डे उध्वस्त करण्यात आले आहेत. यात १२ आरोपींच्या ताब्यातून १७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर आरोपींवर भंडारा कारधा जवाहर नगर करडी तुमसर साकोली लाखनी गोबरवाही व पवनी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.